Universal Code of Conduct/mr
The ratification voting process for the revised enforcement guidelines of the Universal Code of Conduct (UCoC) has now concluded. Results are posted here. The next steps involve enforcement guidelines revision discussions and policy text revision discussions. |
![]() | This page documents an unrevised version of the Universal Code of Conduct approved by the Board of Trustees on December 9, 2020 (see announcement and policy text as ratified), though not approved by the community. This version will not be enforced. Global conversations and proposal drafting on the implementation and application of the UCoC are ongoing. For more information, please see the FAQ. To propose further changes, please visit the the talk page . |
Universal Code of Conduct
![]() | This content mirrors content from the Wikimedia Foundation Governance Wiki for localization purposes. Revisions made as a result of the ratification process are recorded in the change log. |
आमच्याकडे UCoC का आहे
आम्ही विकिमिडिया प्रकल्प आणि मोकळ्या जागांमध्ये सक्रियपणे भाग घेण्यासाठी, अशा जगाच्या आपल्या दृश्यापर्यंत पोहोचण्यासाठी जितके शक्य आहे तितक्या लोकांना सबलीकरण देण्यावर विश्वास ठेवतो ज्यामध्ये प्रत्येकजण सर्व मानवी ज्ञानाची बेरीज करू शकेल. आमचा विश्वास आहे की आमचे योगदानकर्ते जितके शक्य तितके वैविध्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि प्रवेशयोग्य असावेत. या समुदायात ज्यांना सामील व्हावे (आणि त्यात सामील होऊ इच्छित असेल) अशा लोकांसाठी सकारात्मक, सुरक्षित आणि निरोगी वातावरण असले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. ही आचारसंहिता आलिंगन देऊन व आवश्यकतेनुसार अद्यतनांसाठी पुनरिक्षण करण्यासह असेच असल्याचे सुनिश्चित करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. तसेच, आम्ही आमच्या प्रकल्पांचे संरक्षण करू इच्छितो जे सामग्रीत हानी करतात किंवा त्यांना विकृत करतात त्यांच्या विरूद्ध.
Wikimedia च्या ध्येयानुरूप, Wikimedia प्रकल्प आणि स्पेसेसमध्ये सामील असणारे सर्व:
- प्रत्येकाला सर्व ज्ञानामध्ये मोकळेपणाने शेअर करता यावे असे जग तयार करतील.
- पक्षपात आणि पूर्वग्रह टाळणाऱ्या एका जागतिक समुदायात सहभागी होतील, आणि
- त्याच्या सर्व कामात अचूकता आणि पडताळणी करण्याजोगे असेल याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
ही जागतिक आचारसंहिता (Universal Code of Conduct) स्वीकार्य आणि अस्वीकार्य वर्तनाची व्याख्या सांगते. ती अशा प्रत्येकाला लागू आहे, जो Wikimedia च्या ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रकल्पांमध्ये आणि स्पसेसमध्ये परस्परसंवाद करतो आणि योगदान देतो. यामध्ये प्रकल्पांमधील नव्या आणि जुन्या योगदानकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, इव्हेंट ऑर्गनायझर्सचा आणि सहभागी, कर्मचारी आणि संबंधित संस्थांचे बोर्ड सदस्य आणि Wikimedia Foundation चे कर्मचारी आणि बोर्ड सदस्य यांचा समावेश आहे. हे सर्व व्यक्तीशः आणि व्हर्च्युअल इव्हेंट्स, तांत्रिक स्पेसेस, आणि सर्व Wikimedia प्रकल्प आणि wikis यांना लागू होते. यामध्ये समावेश होतो:
- सार्वजनिक आणि उप-सार्वजनिक परस्परसंवाद
- मतभेद आणि एकोप्याची अभिव्यक्ती याबाबत समुदायातील सदस्यांबरोबर चर्चा
- तांत्रिक विकासाच्या समस्या
- कन्टेन्ट योगदानाच्या बाजू
- बहिस्थ भागीदारांशी संबंधित सहयोगी/समुदाय यांचे प्रतिनिधित्व करण्याची प्रकरणे
1. प्रस्तावना
UCoC जगभर विकीडिया प्रकल्प अनेक सहकार्यासाठी वर्तना आधारभूत सुविधा उपलब्ध. येथे नमूद केलेले निकष किमान मानक म्हणून सांभाळताना स्थानिक आणि सांस्कृतिक संदर्भाचा विचार करणारी धोरणे विकसित करण्यासाठी समुदायामध्ये यात भर पडेल.
UCoC हे कोणत्याही अपवादांशिवाय सर्व विकीमिडियन्सना (Wikimedians) लागू करते. UCoC च्या विरोधात कृती केल्यास समुदायाचे प्रतिनिधी आणि या प्लॅटफॉर्म्सचे पदाधिकारी (स्थानिक समुदायांच्या शिफारसी व संदर्भांच्या अनुसार), किंवा या प्लॅटफॉर्म्सचे कायदेशीर मालक म्हणून Wikimedia Foundation यांच्याकडून निर्बंध घातले जाऊ शकतात.
2. अपेक्षित वर्तन
प्रत्येक विकिमीडियन (Wikimedian), मग ते नवीन किंवा अनुभवी संपादक, समुदायाचे पदाधिकारी, संबंधित किंवा WMF बोर्डाचे सदस्य किंवा कर्मचारी असोत, आपापल्या वर्तनासाठी स्वतः जबाबदार राहतील.
सर्व Wikimedia प्रकल्प, स्पेसेस आणि कार्यक्रमांमध्ये वर्तन हे सन्मान, सभ्यता, सहकारिता, एकोपा आणि उत्तम नागरिकत्व यावर आधारित असेल. हे सर्व योगदानकर्ते आणि सहभागी यांना, सर्व योगदानकर्ते आणि सहभागींसोबतच्या त्यांच्या परस्परसंवादामध्ये लागू आहे, यामध्ये वय, मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व, शारीरिक रूप, राष्ट्रीय, धार्मिक, वांशिक, आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी किंवा जात, सामाजिक स्तर, भाषाप्रभुत्त्व, संभोगविषयक आवडीनिवडी, लैंगिक ओळख किंवा करिअरच्या क्षेत्रावर आधारित कोणतेही फरक केले जाणार नाहीत. तसेच आम्ही, मिळवलेले यश, कौशल्ये किंवा Wikimedia प्रकल्प किंवा चळवळीमधील भूमिका यांच्यावरूनही फरक करणार नाही.
2.1 आदर
आदर म्हणजे इतरांना दाखवलेला सन्मान. Wikimedia च्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन वातावरणांमध्ये लोकांशी संपर्क साधताना, आम्ही त्यांना तितक्याच आदराने वागवू, जितका त्यांना आमच्याप्रति दाखवावा अशी आमची इच्छा आहे.
यामध्ये समाविष्ट आहे परंतु यापुरते मर्यादित नाही:
- सहानुभूतीचा सराव. कोणतेही विकिमिडियन्स (Wikimedians) तुम्हाला काय सांगू इच्छितात हे ऐकून घेणे आणि समजण्याचा प्रयत्न करणे. आव्हान स्वीकारायला तयार राहा आणि विकिमिडियन (Wikimedian) म्हणून तुमची स्वतःची समज, अपेक्षा आणि वर्तन हे जुळवून घेणे.
- नेहमी परस्पर विश्वास बाळगा, आणि रचनात्मक, सकारात्मक संपादनाचे काम करणे. आपल्या योगदानामुळे प्रकल्प किंवा कार्याची गुणवत्ता सुधारली पाहिजे. कृपया दयाळू आणि चांगल्या विश्वासाने अभिप्राय द्या आणि प्राप्त करा. टीका संवेदनशील आणि विधायक पद्धतीने केली पाहिजे. सर्व प्रकल्प प्रकल्पात सहकार्याने सुधारण्यासाठी येथे आहेत असा पुरावा अस्तित्त्वात असल्याशिवाय सर्व विकिमीडियांनी असे गृहित धरले पाहिजे, परंतु हानीकारक प्रभावासह विधानांचे औचित्य सिद्ध करण्यासाठी याचा वापर केला जाऊ नये.
- योगदानकर्त्याचे नाव आणि ते स्वतःचे वर्णन कसे करतात त्याचा आदर करा. लोक स्वतःचे वर्णन करण्यासाठी विशिष्ट संज्ञा वापरू शकतात. आदराचे प्रतीक म्हणून, या लोकांशी किंवा त्यांच्याविषयी संपर्क साधताना या संज्ञा वापरा. उदाहरणांमध्ये समावेश आहे:
- वांशिक समूह हे इतरांनी त्यांचे वर्णन करण्यासाठी इतिहासात वापरलेल्या नावाच्या ऐवजी स्वतःचे वर्णन करण्यासाठी एखादे विशिष्ट नाव वापरू शकतात;
- विशेष अक्षरे, आवाज किंवा त्यांच्या भाषेतील तुम्हाला परिचित नसू शकणारे शब्द वापरणारे लोक;
- विशेष नावे किंवा सर्वनावे वापरणारे, एखादा विशिष्ट लैंगिक कल किंवा लैंगिक ओळख असलेले लोक;
- ज्या लोकांची एखादे शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असल्याची ओळख असेल, ते स्वतःचे वर्णन करण्यासाठी एखादा विशिष्ट शब्द वापरू शकतात
- जेव्हा व्यक्तीश: भेटू, तेव्हा आम्ही प्रत्येकाचे स्वागत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि एकमेकांच्या आवडीनिवडी, समज, परंपरा आणि आवश्यकता यांचे भान ठेवू आणि सन्मान करू.
2.2 सभ्यता, सहकारिता, एकोपा आणि उत्तम नागरिकत्व
आम्ही पुढील आचरणासाठी प्रयत्न करतोः
- सभ्यता म्हणजे अपरिचित व्यक्तींसहित समाजामध्ये वर्तन आणि बोलणे यामध्ये उच्च दर्जाची नम्रता.
- सहकारिता म्हणजे समान प्रयत्नांमध्ये गुंतलेले लोक एकमेकांना देतात ते सौहार्दपूर्ण साहाय्य.
- उत्तम नागरिकत्व म्हणजे Wikimedia चे प्रकल्प या उत्पादनशील, आनंददायी आणि सुरक्षित जागा असतील आणि Wikimedia चळवळीमध्ये (Mission) योगदान देणाऱ्या असतील याची खात्री करण्यासाठी सक्रिय जबाबदारी घेणे.
यामध्ये समाविष्ट आहे परंतु यापुरते मर्यादित नाही:
- मार्गदर्शन आणि प्रशिक्षण: नवीन येणाऱ्यांना त्यांचा मार्ग शोधण्यासाठी आणि आवश्यक ते कौशल्य साध्य करण्यासाठी मदत करणे
- एकोपा दाखवा. सहयोगी योगदानकर्त्यांकडे लक्ष ठेवणे, गरजेच्या वेळी त्यांना मदतीचा हात देणे, आणि जेव्हा त्यांना आपल्या मानकांपेक्षा हीन दर्जाची वागणूक मिळेल तेव्हा त्यांच्या वतीने स्पष्ट बोलणे
- योगदानकर्त्यांनी केलेल्या कामाची कदर करा आणि श्रेय द्या: त्यांनी तुम्हाला केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार माना. त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करा आणि जिथे योग्य तिथे त्यांना श्रेय द्या.
3. अस्वीकार्य वर्तन
समुदायातील सदस्यांना वाईट वर्तन आणि उत्पीडनाच्या परिस्थिती ओळखण्यात मदत करणे हे जागतिक आचारसंहितेचे (Universal Code of Conduct) ध्येय आहे. खालील वर्तने ही विकिमिडिया चळवळीअंतर्गत (Wikimedia Movement) अस्वीकार्य समजली जातात:
3.1 उत्पीडन
यामध्ये मुख्यतः एखाद्या व्यक्तीला घाबरवणे, मानभंग करणे किंवा उद्विग्न करण्यासाठी मुद्दाम होऊन केलेले कोणतेही वर्तन समाविष्ट आहे. जर एखादे वर्तन एखाद्या सामान्य व्यक्तीच्या सहनशक्तीच्या पलिकडे जाईल असे असेल (त्यातील संबंधित लोकांचा सांस्कृतिक संदर्भ आणि अपेक्षा विचारात घेता), तर ते उत्पीडन मानले जाऊ शकते. उत्पीडन हे अनेकदा कमजोर स्थितीमध्ये असलेल्या लोकांना उद्देशून केलेल्या भावनिक गैरवर्तनाचे रूप घेते.
- अपमान: यामध्ये उपहासाने नावे ठेवणे, शिव्या किंवा अन्य अपशब्द वापरणे, आणि वैयक्तिक वैशिष्ट्यांवर आधारलेले कोणतेही हल्ले समाविष्ट आहेत. अपमानांचा संदर्भ कल्पित वैशिष्ट्यांशी असू शकतो, जसे बुद्धी, दिसणे, वांशिकता, कूळ, धर्म, संस्कृती, जात, संभोगविषयक आवडीनिवडी, लिंग (स्त्री/पुरुष इ.), अपंगत्व, वय, राष्ट्रीयत्व, राजकीय संबंध, किंवा इतर वैशिष्ट्ये. काही प्रकरणांमध्ये जरी संबंधित एक एक वाक्य म्हणजे अपमान होत नसेल, तरी पुन्हा पुन्हा करण्यात येणारी व्यंग्योक्ती, चेष्टा, किंवा आक्रमक वर्तन हे एकत्रितपणे अपमानच धरले जातील.
- लैंगिक उत्पीडन: इतरांप्रति कोणत्याही प्रकारचे अवांच्छित लैंगिक लक्ष किंवा प्रस्ताव.
- धमक्या: एखाद्या वादात विजय मिळवण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला हवे तसे वागण्यास भाग पाडण्यासाठी शारीरिक हिंसकपणा, कायदेशीर कारवाई, लाज वाटायला लावणारे अयोग्य वर्तन किंवा नावलौकिकाला हानी यांचा वापर करणे.
- इतरांना इजा करण्यास प्रोत्साहन देणे: यामध्ये इतर कोणालातरी स्वतःला इजा करणे किंवा आत्महत्या करणे यासाठी प्रोत्साहन देणे तसेच कोणालातरी तिसऱ्या पार्टीवर हिंसक हल्ला करण्यासाठी प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे.
- डॉक्सिंग: एखाद्याच्या स्पष्ट परवानगीशिवाय त्या व्यक्तीची खाजगी माहिती प्रसिद्ध करणे, जसे नाव, नोकरीचे ठिकाण, एखाद्या प्रत्यक्ष जागेचा पत्ता किंवा ईमेल पत्ता. एक किमान मानक म्हणून, एखाद्या व्यक्तीने खाजगी ठेवण्याचा प्रयत्न केलेली आणि ऑनलाइन प्रकाशित न केलेली माहिती कोणीही प्रकाशित करू नये. अनेक समुदायांमध्ये यापेक्षाही उच्च दर्जा असेल आणि जी माहिती इंटरनेटवर अन्यत्र प्रसिद्ध केली गेली पण एखाद्या Wikimedia प्रकल्पावर केली गेली नाही, ती प्रसिद्ध करण्यास बंदी करणे ते पसंत करतील.
- पाठलाग करणे: एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण प्रकल्पामध्ये पाठलाग करणे आणि तिला अस्वस्थ करण्याच्या किंवा परावृत्त करण्याच्या उद्देशाने तिच्या कामावर सतत टीका करणे.
- ट्रोलिंग: एखाद्याला हेतुतः भडकवण्यासाठी मुद्दाम होऊन बोलण्यामध्ये व्यत्यय आणणे किंवा वाईट उद्देशाने पोस्ट करणे.
3.2 अधिकार, खास अधिकार, किंवा प्रभाव यांचा गैरवापर
जेव्हा एखादी प्रत्यक्ष अधिकाराच्या, खास अधिकारांच्या किंवा प्रभावाच्या स्थानावरील किंवा तशी असल्याचे मानली गेलेली व्यक्ती इतर लोकांसोबत अपमानजनक, क्रूर आणि/किंवा हिंसक वर्तन करते, तेव्हा (त्या अधिकाराच्या किंवा प्रभावाच्या स्थानाचा) गैरवापर होतो. Wikimedia मधील वातावरणात तो बहुतांश वेळा भावनिक गैरवापराचे रूप घेतो (मौखिक, मानसिक, मानसशास्त्रीय गैरवापर) आणि त्याच्यासह उत्पीडनही येऊ शकते.
- पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर: Wikimedia Foundation किंवा Wikimedia संबंधित संस्थांच्या (निवडण्यात आलेल्या) पदाधिकाऱ्यांच्या, तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हाती असलेल्या अधिकारांचा, ज्ञानाचा किंवा संसाधनांचा गैरवापर इतरांना धाकदपटशा करण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी, किंवा स्वतःच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायद्यांसाठी करणे.
- वरिष्ठता आणि संबंध यांचा गैरवापर: इतरांना धाकदपटशा करण्यासाठी एखाद्याची जागा आणि नावलौकिक यांचा वापर. चळवळीमधील लक्षणीय अनुभव आणि संबंध असलेल्या लोकांना आम्ही विशेष काळजीपूर्वक वर्तन करायला सांगतो कारण दुखावणाऱ्या मतप्रदर्शनांमध्ये मित्र आणि पाठिराख्यांकडून धोके निर्माण करण्याचा एक अनुद्देशित अर्थ निघू शकतो.
- गॅसलाइटिंग (मानसशास्त्रीयरीत्या आपल्याला हवे तसे वागायला लावणे/वळवणे): कोणालातरी त्यांच्या स्वतःचे मत, संवेदना, किंवा समज याविषयी शंका घेण्यासाठी काम करणे (एकटे किंवा समूहासह). समुदायाचे अधिकार असलेल्या लोकांकडे विश्वासार्ह असल्याचे मानले जाण्याचा एक विशेषाधिकार असतो आणि त्यांनी याचा गैरवापर, त्यांच्याशी मतभेद असणाऱ्यांवर हल्ले करण्यासाठी करू नये.
3.3 प्रकल्पांच्या कन्टेन्टचा विध्वंस आणि गैरवापर
Wikimedia प्रकल्पांमध्ये मुद्दाम चुकीचे किंवा पक्षपाती कन्टेन्ट सादर करणे किंवा कन्टेन्ट निर्मितीमध्ये अडथळे आणणे. यामध्ये समाविष्ट आहे परंतु यापुरते मर्यादित नाही:
- कन्टेन्ट हे सुयोग्य तोलाचा (पीअर) आढावा किंवा सुधारणेसाठी ठोस फीडबॅक यांच्याशिवाय पुन्हापुन्हा काढून टाकणे
- सत्य गोष्टी किंवा मताचा विशिष्ट अर्थ लावता यावा यासाठी कटेन्ट पद्धतशीरपणे त्यानुसार हाताळणे
- वंश, धर्म, वर्ण, संभोगविषयक ओळख, लैंगिक ओळख, वांशिकता, अपंगत्व किंवा मूळ देश यांवर आधारित, एखाद्या समूह किंवा लोकवर्गाची बदनामी करणे, चेष्टा करणे किंवा त्यांच्या विरोधात द्वेष पसरवण्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेले द्वेषगर्भ बोलणे
- इतरांना धाकदपटशा किंवा इजा करण्याच्या उद्देशाने चिन्हे, प्रतिमा किंवा कन्टेन्ट याची अवांच्छित, असमर्थनीय जोड करणे.
|