विकिमीडिया फाउंडेशन बोर्ड ऑफ ट्रस्टीज

From Meta, a Wikimedia project coordination wiki
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of the page Wikimedia Foundation Board of Trustees/Overview and the translation is 94% complete.
Outdated translations are marked like this.

विकिमिडिया फाउंडेशन
बोर्ड ऑफ ट्रस्टीज


Idea or report icon (the Noun Project 2384902).svg
Wikimedia Community Logo.svg

तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही जेव्हा विकिपीडियावर तुमचा आवडता लेख वाचत असता, तेव्हा हजारो लोक मुक्त ज्ञान मुक्त करण्यासाठी काम करत असतात?

जगभरात लोकांचा एक विलक्षण समूह आहे जो विकिपीडिया, विकिडेटा, विकिसोर्स इ. महान प्रकल्प तयार करत असतो.

हे काम करण्यासाठी त्यांना विकिमीडिया फाउंडेशन मदत करते. तांत्रिक पायाभूत सुविधा, कायदेशीर आव्हाने, आणि मोठे होताना येणाऱ्या अडचणी या गोष्टींची ते काळजी घेतात.

Wikimedia Foundation logo - vertical.svg

विकिमीडिया फाउंडेशन मध्ये विकिमीडिया फाउंडेशनच्या कार्यावर देखरेख ठेवणारे बोर्ड ऑफ ट्रस्टीज आहे. ट्रस्टींची निवड अंशतः सामूहिक प्रक्रियांमधून आणि अंशतः थेट बोर्डकडून केली जाते.

बोर्डवर 16 पदे असतात:
8 समूह-आणि-अफिलिएट पदे,
7 बोर्डनियुक्त पदे,
1 संस्थापक पद.

16 people icon.svg

प्रत्येक ट्रस्टीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो.


Global search icon (the Noun Project 1238421).svg
Voting icon (the Noun Project 2536419).svg

बोर्डनियुक्त ट्रस्टी जागतिक शोधप्रक्रियेद्वारे निवडले जातात. एकदा बोर्ड ऑफ ट्रस्टीज आणि उमेदवार यांचे परस्परयोग्यतेबाबत समाधान झाले की, ते बोर्डवर येतात.

सामूहिक (कम्युनिटी) ट्रस्टींसाठी मतदान करण्याची संधी विकिमीडिया समूहाला मिळते. एक संघ म्हणून बोर्डाचे प्रतिनिधित्व, वैविध्य आणि तज्ज्ञता वाढवण्याची ही संधी असते.


ट्रस्टीज प्रतिवर्षी 150 तास काम करण्यास वचनबद्ध असतात. ते बोर्डाच्या समित्यांपैकी किमान एका समितीवर काम करतात. या समित्यांमध्ये बोर्ड प्रशासन, लेखापरीक्षण, मानव संसाधन, उत्पादन, विशेष प्रकल्प, आणि समूहविशिष्ट बाबी यांचा समावेश होतो. Directors icon (the Noun Project 3156284).svg
सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध असलेली बैठकांची इतिवृत्ते फाउंडेशन विकिच्या बैठकांच्या पृष्ठावर किंवा समित्यांच्या पृष्ठांवर प्रकाशित केली जातील.
Info icon (the Noun Project 2397884).svg बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी आणि या आपण बोर्डाशी कसे जोडले जाऊ शकता याविषयीही अधिक जाणून घेण्यासाठी हे पृष्ठ पाहा.