Talk:List of Wikipedias/mr
Add topicअॅन्ड्रॉईड
[edit]अॅन्ड्रॉईड ही मोबाईल्ससाठी असलेली चालनप्रणाली आहे. ती खास करुन स्मार्टफोन्स आणि टॅब्लेट पीसींसाठी बनवलेली आहे. अॅन्ड्रॉईड नावाची मूळ कंपनी गुगलने ५ नोव्हेंबर २००७ ला खरेदी केली आणि नंतरवाढवली. अॅन्ड्रॉईड ही ’ओपनसोर्स सिस्टीम’ आहे. ओपन सोर्स म्हणजे तिचा सोर्स कोड सर्वांना उपलब्ध आहे. त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. मायक्रोसॉफ्टची विंडोज जशी आपल्याला विकत घ्यावी लागते आणि आपल्याला तिचा फक्त सेट अप मिळतो तशी अॅन्ड्रॉईड नाही. त्यामुळे अॅन्ड्रॉईड वाढवण्यासाठी कुणीही त्यात भर घालू शकतं.अॅन्ड्रॉईड ही लिनक्स कर्नेल वर चालते. आज बाजारात अनेक प्रकारचे अॅन्ड्रॉईड फोन्स उपलब्ध आहेत. अॅन्ड्रॉईडची वैशिष्ट्ये: १) हॅन्डसेट लेआऊट्स: अॅन्ड्रॉईड फोन्सची स्क्रीन साईज ब-यापैकी मोठीअसते. त्यावर आपण टू डी, थ्रीडी अॅप्लिकेशन्स आरामात वापरु शकतो. २) स्टोरेज: अॅन्ड्रॉईडमधे स्वत:चा डेटाबेस आहे. त्याला एस्क्युलाईट म्हणतात. ३) कनेक्टिव्हीटी: अॅन्ड्रॉईड विविध पद्धतींनी कनेक्ट होऊ शकतो जसं GSM/EDGE , IDEN , CDMA , EV-DO , UMTS , Bluetooth , Wi-Fi , LTE , NFC आणि WiMAX ४) भाषा सहाय्य: अॅन्ड्रॉईड वेगवेगळ्यामानवी भाषांमधे काम करु शकतो. ५) वेब ब्राऊजर: अॅन्ड्रॉईडकडे चांगला वेब ब्राऊजर आहे. ६) जास्तीचा (अॅडिशनल) हार्डवेअर सपोर्ट अॅन्ड्रॉईड व्हिडिओ/स्टील कॅमेरा वापरुशकतो तसेच टचस्क्रीन , जीपीएस , अॅक्सिलरोमीटर , गायरोस्कोप , मॅग्नेटोमीटर , डेडिकेटेट गेमिंग कन्सोल, प्रेशर सेन्सर तसेच थर्मोमीटर अशी वैशिष्ट्ये त्यात आहेत. याव्यतिरिक्त जावा सपोर्ट, सर्व प्रकारचा मिडिया सपोर्ट (एमपीथ्री/फोर फाईल्स आणि इतर), स्ट्रिमिंग मिडिया सपोर्ट, मल्टिटच , ब्ल्युटूथ, व्हिडिओ कॉलिंग, मल्टिटास्किंग, व्हॉईस इनपुट, टिथरिंग , स्क्रीन कॅप्चर अशी अनेक वैशिष्ट्ये अॅन्ड्रॉईडची आहेत. वापर: अॅन्ड्रॉईडचा वापर प्रामुख्याने स्मार्टफोन्स , नेटबुक , टॅब्लेट कॉम्प्युटर्स , गुगल टीव्ही इत्यादीत होतो. गुगल टीव्हीप्रामुख्याने अॅन्ड्रॉईडची एक्स८६ ही आवृती वापरते.
अॅन्ड्रॉईड आवृतींचा इतिहास: ऑक्टोबर २००३: अमेरिकेतल्याकॅलिफोर्निया राज्यातल्या पाउलो अल्टो येथे अॅन्डी रबिन, रिक मायनर, निक सिअर्स आणि ख्रिस व्हाईट यांनी अॅन्ड्रॉईडची मुहुर्तमेढ रोवली. ऑगस्ट २००५: गुगलने अॅन्ड्रॉईड कंपनी विकत घेतली. ५ नोव्हेंबर २००७: ’ओपन हॅन्डसेट अलायन्स’ ची स्थापना झाली. १२ नोव्हेंबर २००७: अॅन्ड्रॉईडची बीटा आवृती बाजारात आली. २३ सप्टेंबर २००८: पहिला अॅन्ड्रॉईड फोन, एच.टी.सी. ड्रीम अॅन्ड्रॉईडच्या पहिल्या(१.०) आवृतीसह बाजारात आला.यात खालील वैशिष्ट्ये होती. १) गुगलच्या विविध सेवांबरोबर आदानप्रदान २) एचटीएमएल, एक्सएचटीएमएल, अनेक एचटीएमएल पेजेसला सहाय्य करणारा वेब ब्राऊजर. ३) अॅन्ड्रॉईड मार्केट वरुन अॅप्लिकेशन्स उतरवून घेणे (डाऊनलोड करणे) आणि अद्ययावत (अपग्रेड) करणे. ४) मल्टीटास्किंग, इन्स्टंट मॅसेजिंग, वाय-फाय आणि ब्लुटूथ सहाय्य. ९ फेब्रुवारी २००९: फक्त टी-मोबाईल जी१ साठी अॅन्ड्रॉईडची आवृती १.१ बाजारात आली. ३० एप्रिल २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अॅन्ड्रॉईडची आवृती १.५ बाजारात आली, जी कपकेक या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे: १) अधिक वेगवान कॅमेरा, आणि वेगवान फोटो कॅप्चर २) अधिक वेगवान जी.पी.एस. यंत्रणा ३) स्क्रीनवरचा की-बोर्ड ४) यातून व्हिडिओ सरळ तूनळी (यूट्यूब) आणि पिकासावर चढवता (अपलोड करता) येत होते. १५ सप्टेंबर २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अॅन्ड्रॉईडची आवृती १.६ बाजारात आली, जी डोनट या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे: १) वेगवान शोध यंत्रणा, व्हॉईस सर्च २) एका क्लिकवर व्हिडीओ आणि फोटो मोडमधे चेंज करता येऊ शकणारा कॅमेरा ३) बॅटरी वापर दर्शक ४) CDMA सपोर्ट ५) अनेक भाषांमधील टेक्स्ट टू स्पीच २६ ऑक्टोबर २००९: लिनक्स कर्नेलवर आधारित अॅन्ड्रॉईडची आवृती २.० बाजारात आली, जी इक्लेअर या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे: १) अनेक ईमेल अकांऊंट्स २) ईमेल अकांऊंट्ससाठी मायक्रोसॉफ्ट एक्स्चेंजचं सहाय्य ३) ब्ल्युटूथ २.१ सहाय्य ४) नविन ब्राऊजर जो एच.टी.एम.एल. ५ ला सहाय्य करतो. ५) नविन कॅलेंडर ३ डिसेंबर २००९: अॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती २.०.१ बाजारात आली. १२ जानेवारी २०१०: अॅन्ड्रॉईडची एस.डी.के आवृती २.१ बाजारात आली. २० मे २०१०: लिनक्स कर्नेलवरआधारित अॅन्ड्रॉईडची आवृती२.२ बाजारात आली, जी फ्रोयो या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे: १) विजेट्स सहाय्य: विजेट्स म्हणजे छोटे छोटे प्रोग्राम्स असतात जे होमस्क्रीनवर डकवता येतात. उदा: आजपासून ख्रिसमसला कितीदिवस बाकी आहेत याचा प्रोग्राम, तापमान दर्शक, येण्या-या महिन्यात तुमच्याफोनबुकमधे असलेल्या कुणाचा वाढदिवस आहे हे सांगणारा छोटासा प्रोग्राम इत्यादी. २) सुधारीत आदानाप्रदान सहाय्य. ३) हॉटस्पॉट सहाय्य. ४) अनेकविध भाषांमधील की-बोर्ड. ५) अॅडोब फ्लॅश आवृत्ती १०.१ सहाय्य. ६ डिसेंबर २०१०: लिनक्स कर्नेलवर आधारित अॅन्ड्रॉईडची आवृती २.३ बाजारात आली, जी जिंजरब्रेड या नावानेही ओळखली जाते. २२ फेब्रुवारी २०११: लिनक्स कर्नेलवर आधारित अॅन्ड्रॉईडची आवृती २.३.३ बाजारात आली, तसेच टॅब्लेट पीसींसाठीची अॅन्ड्रॉईडची आवृती ३.० बाजारात आली, जी हनिकोंब या नावानेही ओळखली जाते. याची वैशिष्ट्ये म्हणजे: १) ही आवृत्ती खासकरुन टॅब्लेट पीसींसाठी आणि मोठ्या स्क्रीनच्या फोन्ससाठी बनवली गेली. २) सुधारीत मल्टीटास्किंग, बदलता येण्याजोगी होमस्क्रीन आणि विजेट्स. ३) ब्लुटूथ टिथरींग ४) चित्रे/व्हिडीओ पाठवण्याची अंतर्गत सोय. १०-११ मे २०११: गुगलने अॅन्ड्रॉईडच्या ’आईस्क्रीमसॅंडविच’ आवृत्तीची घोषणा केली.