सुरक्षितता/परवलीच्या शब्दाची पुनर्स्थापना

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Security/Password reset and the translation is 100% complete.

विशेष सदस्य अधिकार असणाऱ्या विकिच्या खात्यांवर कब्जा करणाऱ्या आक्रमणकर्त्यांकडून आम्हास अनेक समस्या उद्भवत आहेत (उदाहरणार्थ,प्रशासक,ब्युरोक्रॅटस्,ओव्हरसाईटर्स व चेकयूजर्स). असे दिसते कि हे, बहुदा कमकुवत किंवा त्याच-त्याच परवलीच्या शब्दांच्या पुनर्वापरामुळे असे शक्य आहे.

ही समस्या सोडविण्यास प्रतिष्ठानात, अनेक चमूंसह समाजाचे सदस्य,कार्यरत आहेत.

त्यादरम्यान,आम्ही सांगतो कि,प्रत्येकाने निवडलेल्या त्यांच्या विकिखात्याच्या परवलीच्या शब्दाकडे जरा नजर फिरवा.जर आपण हे जाणत असाल कि आपला परवलीचा शब्द कमकुवत आहे, किंवा आपण इतर कुठे वापरत असलेला परवलीचा शब्द येथे निवडला आहे, तर, कृपया ते परवलीचे शब्द बदलवा.

मजबूत परवलीचे शब्द निवडा--आठ किंवा अधिक वर्ण लांबीचे, ज्यात शब्द, आकडे व विरामचिन्हे असतील.