विकि लह्ज लव्ह/प्रसारणासाठीची माहिती/२०१९/०१

From Meta, a Wikimedia project coordination wiki
This page is a translated version of the page Wiki Loves Love/communication release/2019/01 and the translation is 100% complete.

आम्ही तुम्हांला विकि लव्ह्ज लव्ह २०१९ आयोजित करण्यासाठी आमंत्रिक करीत आहोत.

विकि लव्ह्ज लव्ह ही एक आंतरराष्ट्रिय छायाचित्र स्पर्धा आहे, जिचे आयोजन विकिमिडीया कॉमन्सवर फेब्रुवारी महिन्यात घडणाऱ्या प्रेमाच्या कहाण्या टिपण्यासाठी केले जाते.

ह्या स्पर्धेचा प्राथमिक उद्देश प्रेमाच्या विविध कहाण्या ऐतिहासिक स्थळे, सण-उत्सव, प्रेमाचा उबदार स्पर्श दाखवणारे कोणत्याही घटना, प्रसंग तसेच प्रेमाची प्रतिके यांचे दस्ताऐवजीकरण करणे हा होय. या छायाचित्रे आणि चलचित्रांचा उपयोग विकिपीडियावरील प्रेमासंबंधीचे लेख सुधारण्यासाठी तसेच इतर विकि प्रकल्पांमध्ये केला जाऊ शकेल.

फेब्रुवारी महिना आता जवळ आलेला आहे आणि विकि लव्हज लव टिम तुमांला तुमच्या समुदायामध्ये डब्लूएलएल१९ ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आमंत्रित करत आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन आपण प्रेम साजरे करुयात आणि ते विकिमिडीया कॉमन्सच्या मदतीने नोंदवूनही ठेऊयात. या वर्षीच्या स्पर्धेचा विषय प्रेमाविषयीचे सण-उत्सव आणि प्रेमाचे साजरीकरण हे आहेत.

जर तुम्हांला विकि लव्हज लव्ह तुमच्या प्रदेशात आयोजित करायचे असेल तर, डब्लूएलएल आयोजक या विभागात तुमचे नाव नोंदवा. ह्या स्पर्धेचा कालावधी १-२८ फेब्रुवारी २०१९ हा आहे.

ह्या स्पर्धेत सहभागी होण्या व्यतिरीक्त तुम्ही विकि लव्हज लव्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे याची काळजी घेत, आपल्या भाषेत या स्पर्धेचे अपलोड विझार्ड, साचे आणि पाने इ. साहित्य भाषांतरीत करून आपले योगदान देऊ शकतात. येथे तुम्ही भाषांतर आवश्यक असलेल्या साहित्याची यादी पाहू शकता. :

जगातील सगळ्या प्रेमाची बेरीज कशी दिसेल याची कल्पना करा !

विकी लव्हज् लव्ह टिम मिडिया विकि लोकप्रसारणाद्वारे पाठवले गेले.