अनुदानःएपीजी/प्रस्ताव/२०१९-२०२० फेरी २/सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी/प्रगती अहवाल/प्रस्तावना

From Meta, a Wikimedia project coordination wiki
Jump to navigation Jump to search

सीआईएस-ए2के गटाने १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान घेतलेल्या कार्यक्रम आणि उपक्रमांची माहितीदेणारा प्रगती अहवाल सादर करीत आहोत. या सहा महिन्यात कोविड-१९ विषयीची विकीमिडिया फाउंडेशनची मार्गदर्शक तत्त्वे आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या सूचना लक्षात घेवून लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असलेले कोणतेही कार्यक्रम आम्ही स्वत: केले नाहीत किंवा इतर अशा उपक्रमांना मदतही केली नाही.

ज्यांच्या सहकार्याने आम्ही उपक्रम करतो अशा सर्व संस्था, विशेषत: शैक्षणिक संस्था, या कालावधीत बंद होत्या. याचा परिणाम मेट्रिक्स मधील एकूण सहभागी सदस्य, नवीन सदस्य आणि विस्ताराची ठिकाणे यावर झालेला आपण पाहू शकता. ऑनलाईन कार्यक्रमातील विविध ठिकाणच्या सहभागाची नोंद घेण्यासाठीची योग्य पद्धत आम्ही आम्ही निश्चित करू शकलो नाही. राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील कोणतेही प्रत्यक्ष कार्यक्रम न झाल्याने मिळालेल्या निधीतील प्रवास, निवास इ. वरील तरतूद शिल्लक राहिली आहे.

तथापि, हा कालावधी आम्ही आमच्या कार्यक्रमांची पुनर्रचना करण्यासाठी, नवीन कल्पनांवर विचार करण्यासाठी आणि आपल्या क्षमतांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी वापरला. ऑनलाईन प्रशिक्षण व दूरस्थ पद्धतीने समुदायांना सक्षम करण्यासाठी अनेक प्रभावी मार्ग या प्रक्रियेतून आमच्या लक्षात आल्या आहेत. गेल्या एक वर्षापेक्षा अधिक काळ, आम्ही ऑनलाइन कार्यक्रमांच्या पद्धतींवर अधिक लक्ष केंद्रित करून विविध शक्यता अजमावत आहोत. या सहा महिन्यांत आम्ही या क्षेत्रात समुदायांसोबत विविध उपक्रम करण्यात यशस्वी झालो. उदाहरणार्थ:

 1. ऑक्टोबरमध्ये आम्ही विकिडेटा प्रकल्पाचा आठवा वाढदिवस भारतात साजरा करण्यास पाठिंबा दर्शविला. यामध्ये वेबिनारांची मालिका व डेटाथॉन आयोजित केला.
 2. आम्ही नोव्हेंबरमध्ये विकीस्रोतवर राष्ट्रीय प्रूफरीड-ए-थॉन आयोजित केले, ज्यामध्ये ११ भाषिक विकी समुदायातील २८० सदस्यांनी भाग घेतला.
 3. आम्ही मिनी एडिट-ए-थॉन्सची मालिका सुरू केली आणि ३१ डिसेंबर २०२० पर्यंत दोन एडिट-ए-थॉन आयोजित केले.
 4. विविध विकिमीडिया विषयांवर ऑनलाईन प्रशिक्षण मालिका आयोजित करण्यात आली.
 5. आम्ही विविध प्रकारचे साहित्य मुक्त ज्ञानस्रोतात आणण्याची मोहीम अधिक जोमाने राबविली. या काळात १०० हून अधिक पुस्तके आणि इतर सामुग्री मुक्त करून अपलोड केली गेली.
 6. आम्ही टेक-इंटर्न सोबत काम केले. ज्यामुळे एक विकीस्रोत साधन पुनरुज्जीवित केले गेले.
 7. विकिमीडिया प्रकल्पांवर दोन संशोधन अभ्यास प्रकाशित झाले.

ए2के गट मुक्त ज्ञान निर्मितीसाठी सातत्याने परिश्रम करणारे विकिमीडिया सदस्य आणि समुदाय यांच्यासोबत पूर्ण क्षमतेने काम करण्यास वचनबद्ध आहे. ए2के गटातील अनेक सदस्य स्वयंसेवक म्हणूनही विकिमीडिया प्रकल्पांत सक्रिय आहेत. त्यांचा प्रत्यक्ष अनुभव, संवाद आणि समुदायांसोबतचे साहचर्य यामुळे आम्हाला समुदायाच्या गरजा चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मदत होते. येत्या सहा महिन्यांत आम्ही आमच्या प्रस्तावा नुसार कार्य करु. पुढील क्षेत्रांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे:

 1. रिमोट कार्यक्रम: सध्या आम्ही Wikimedia Wikimeet India 2021 या ऑनलाईन विकीमीटची तयारी करीत आहोत. हा कार्यक्रम १९-२१ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होईल. याशिवाय आम्ही ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यावर भर देत राहू.
 2. तांत्रिक विकास: आम्ही गेल्या सहा महिन्यांत एक साधन विकसित केले आहे. आम्ही भारतीय समुदायांसाठी आवश्यक तांत्रिक बाबींवर काम करत राहू.
 3. विकिमिडिया धोरण २०३०: आम्ही विकिमीडिया धोरण २०३० च्या अंमलबजावणीच्या टप्प्यात समुदाय आणि सहयोगी संस्थांसोबत कार्य करू.
 4. वैश्विक सहभाग आणि ज्ञान देवाणघेवाण: वैश्विक समुदायांना ए2के गटाच्या भारतातील चांगल्या कामांबद्दल फारशी माहिती नाही असे आम्हाला जाणवले आहे. काही कामांवरील कथा व अनुभव आम्ही याप्रकारे विविध माध्यमांतून पोचवायला सुरुवात केली आहे. आम्हाला विश्वास आहे की, अशा प्रकारे ज्ञानाची व अनुभवांची देवाणघेवाण इतरांना जोडून घेण्यासाठी आणि कार्यक्रमाच्या अधिक चांगल्या नियोजनासाठी भविष्यात उपयुक्त ठरेल.