Help:एकीकृत प्रवेश

From Meta, a Wikimedia project coordination wiki
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of the page Help:Unified login and the translation is 92% complete.
Outdated translations are marked like this.
Other languages:
Afrikaans • ‎Bahasa Indonesia • ‎Bahasa Melayu • ‎British English • ‎Canadian English • ‎Cymraeg • ‎Deutsch • ‎English • ‎Esperanto • ‎Ido • ‎Lëtzebuergesch • ‎Nederlands • ‎Simple English • ‎Sunda • ‎Tagalog • ‎Tiếng Việt • ‎Türkçe • ‎azərbaycanca • ‎català • ‎dansk • ‎español • ‎français • ‎interlingua • ‎italiano • ‎kurdî • ‎lietuvių • ‎magyar • ‎occitan • ‎polski • ‎português • ‎português do Brasil • ‎română • ‎slovenčina • ‎slovenščina • ‎suomi • ‎svenska • ‎čeština • ‎Ελληνικά • ‎български • ‎русский • ‎українська • ‎עברית • ‎اردو • ‎العربية • ‎جهلسری بلوچی • ‎فارسی • ‎अवधी • ‎नेपाली • ‎मराठी • ‎हिन्दी • ‎বাংলা • ‎ਪੰਜਾਬੀ • ‎ગુજરાતી • ‎తెలుగు • ‎മലയാളം • ‎ไทย • ‎ဘာသာ မန် • ‎中文 • ‎日本語 • ‎粵語 • ‎ꯃꯤꯇꯩ ꯂꯣꯟ • ‎한국어
साहाय्य पाने एकीकृत प्रवेश
Shortcut:
H:UL
आपले वैश्विक खाते (ज्यास एकीकृत प्रवेश किंवा एसयूएल/एकल सदस्य प्रवेश असेही म्हणतात), हे आपले एकच सदस्यनाव आहे जे सर्व विकिमिडिया प्रकल्पांमध्ये आरक्षित ठेवल्या गेले आहे(काही विशेष विकि सोडुन).हे आपणास, संपूर्ण विकिमिडियात एक सुसंगत ओळख देते,वैश्विक सदस्य पाने यासारखे फिचर्स सक्षम करते वैयक्तिकरणाचे व्हेक्टर घटविते,आणि आपण प्रत्येक विकिवर मानवीकृत प्रवेश न करता, आपणास अनेक प्रकल्पांना भेट देणे सहज शक्य करते.आपण,ज्या प्रकल्पावर आपले खाते असेल तेथे, खाते विलीनीकरण यास भेट देऊन व तेथील सूचना पाळुन,आपण वैश्विक खाते निर्माण करु शकता.


वैश्विक खात्याबद्दल

ते काय आहे

Wikimedia Foundation हे अनेक भाषांत, अनेक संपादण्याजोगे विकि चालविते. पारंपारिकरित्या, सदस्यांना प्रत्येक विकिवर वेगवेगळे सदस्य खाते तयार करावयास लागायचे. हे त्यांच्या अनेक विकिवरील सहभागास एक कठीण काम करीत होता, विशेषतः , जेंव्हा विकिमिडिया कॉमन्सने बहुमाध्यमांचे एकीकरण अधिक जरुरी केले व विकिडाटा हा आंतरविकि दुव्यांसाठी एक केंद्रीय विकि बनला.

आपले वैश्विक खाते आपले नाव सर्व विकिंवर आरक्षित करुन, या सर्व अडचणी सोडविते (जेणेकरुन कोणीही आपले नाव तोतयेगिरीने वापरु शकत नाही), व एखाद्या विकिवर जेथे आपण कधीही भेट दिली नाही, तेथे आपले स्थानिक सदस्य खाते आपोआप तयार करते.

आपले खाते एकीकृत कसे करावयाचे

अविचलरित्या, सध्या आपले सदस्यखाते हे वैश्विक आहे, परंतु, जूने सदस्यखाते हे खाते विलीनीकरण येथे भेट देऊन, मानवीकृत एकीकृत करावयास हवे. आपण आपल्या वैश्विक खात्याचा तपशिल बघण्यास Special:CentralAuth हे वापरु शकता.आपण आपल्या पसंतीक्रमात टाकलेला विपत्रपत्ता व परवलीचा शब्द सर्व विकिंवर वापरल्या जाईल. याचा अर्थ असा आहे कि, आपणास विकिमिडियाच्या कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पावर एकाच सदस्यनावाने व परवलीच्या शब्दाने सनोंद प्रवेश करणे शक्य होते.

ते काय बदलविते

कोणत्याही सार्वजनिक विकिमिडिया विकीवर आपले सदस्यनाव नोंदविल्याने ते नाव आपोआप सर्व विकिंवर आरक्षित होते, याचा अर्थ असा कि,वेगवेगळे सदस्य एकच विशिष्ट नाव हे वेगवेगळ्या विकिंवर नोंदवु शकत नाहीत. सदस्याने फक्त एकाच खात्यात त्याचा विपत्रपत्ता हा स्थापुन त्याची खात्री करायची.कोणत्याही विकिवर परवलीचा शब्द बदलविल्यास तो सर्व विकिंवर त्याप्रमाणे बदलविल्या जातो. Special:UserLogin हे सदस्यास सर्व एकीकृत विकिंवर एकाचवेळेस सनोंद प्रवेश करविते, व सनोंद प्रवेश पानावरुन ते पूर्ण प्रभारीत झाल्याशिवाय बाहेर जाण्याने प्रवेश अपूर्ण राहु शकतो (म्हणजेच, सदस्य हा यशस्वीरित्या सर्व विकिंवर प्रवेशु शकत नाही).

सदस्याच्या सनोंद प्रवेशास, ते पहिल्यांदा त्या विकिस भेट देतील तेंव्हा, ते अतिरिक्त विकि जोडल्या जातील.उदाहरणार्थ,एक नेहमीचा कॉमन्स व जर्मन विकिपीडियाचा सदस्य, हा आपोआप इंग्लिश विकिबुक्स व प्रवेशु शकणार नाही, परंतु, त्या सदस्याने जर सनोंद प्रवेशित असतांना जर इंग्लिश विकिबुक्सला भेट दिली तर, ते आपोआप पुढे इंग्लिश विकिबुक्स वर सनोंद प्रवेश झालेले असतील.(आपण कोणत्या विकिवर सनोंद प्रवेशित असता हे येथे Special:CentralAuth बघा).

ते काय बदलवित नाही

  • काही गोष्टी अजूनही स्थानिकच आहेत:
    • सदस्य अधिकार हे बहुदा स्थानिकच असतात, याचा अर्थ असा कि, प्रशासकास प्रत्येक ठिकाणी प्रशासकिय पोहोच असू शकत नाही.वैश्विक गट जसे, वैश्विक रोलबॅक,वैश्विक प्रचालक,वैश्विक आंतरपृष्ठ संपादक व वैश्विक अंकपत्ता प्रतिबंधन सूट याची विनंती प्रतिपालकांना विनंत्या/वैश्विक परवानग्या येथे करता येईल.
    • पसंतीक्रम स्थानिक असतो, जरी विपत्रपत्ता स्थापावा लागतो,तरी त्याची खात्री एकाच ठिकाणी करण्यात येते.आपण वेगवेगळ्या संकेतस्थळांवर वेगवेगळा पसंतीक्रम ठेऊ शकता. भविष्यात असेही शक्य आहे कि, आपण वैश्विक पसंतीक्रम स्थापू शकता.[1]
    • अधिसूचना जेंव्हा आपणास नविन संदेश याद्वारे मिळतो, तो स्थानिकच असतो;आपण जे संकेतस्थळ बघत आहात, त्यावरीलच "नविन संदेश" अधिसूचना बघाल. हे भविष्यात बदलेल.[2][3]
  • सदस्य आताही दोन संकेतस्थळांवर वेगवेगळे नाव असलेली खाती वापरु शकतात; तसेही, ही दोन खाती एकाच वैश्विक खात्यास एकत्र जोडली जाणार नाहीत.
  • वैश्विक खाते प्रणाली ही खुल्या विकिमिडिया प्रकल्पांवरच उपलब्ध आहे. मिडियाविकि संचेतनावर चालणारी संकेतस्थळे पण ज्याचे चालन फाऊंडेशन करीत नाही, यावर वेगळी खाते प्रणाली असणे सुरु राहील.त्यांनी, सेंट्रलऑथ हे विस्तारक, जे एकीकृत प्रवेश प्रणालीसाठी जबाबदार आहे, उभारले तरीही.

विसंवाद सोडवणूक

हेही बघा: एकल सदस्य सनोंद प्रवेश पूर्ण झाल्याची उद्घोषणा

ही प्रणाली,जर त्यां सर्व खात्यांना तोच अधिकृत विपत्रपत्ता असेल किंवा जर सदस्याने त्याचा परवलीचा शब्द बरोबर पुरविला तर, सदृश्य नावे असलेली खाती आपोआप विलीन करेल

कारण नोंदणी ही प्रत्येक विकिवर वेगवेगळी होती, तेथे अशी अनेक सदस्यनावे आहेत कि, जी वेगवेगळ्या विकि प्रकल्पांवर वेगवेगळी आहेत.नविन प्रणाली ही प्रति नावास एकच सदस्यत्वाची परवानगी देते, म्हणून अशी काही प्रकरणे आहेत ज्यांच्या खात्यांचे पुनर्नामाभिधान करावे लागले.हे stewardद्वारा मानवीकृत रीतीने करावे लागते. (प्रतिपालकास विनंत्या/सदस्यनाम बदलबघा)

विलीनीकरणाआधी सदस्यांनी विशेष:सेंट्रलऑथ हे वापरुन,काही दोष आहेत का ते बघावे.

वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न

माझ्या वैश्विक खात्याचे पुनर्नामाभिधान होऊ शकते काय?

होय. आपण हे आवेदन वापरुन आपण पुनर्नामाभिधानाची विनंती करु शकता किंवा प्रतिपालकास विनंत्या/सदस्यनाम बदल वर एक विनंती टाकू शकता, जेथे एखादा प्रतिपालक किंवा वैश्विक पुनर्नाम अधिकारी आपल्या विनंतीकडे बघेल. अधिक तपशिलासाठी, वैश्विक पुनर्नामाभिधान नीती हे बघा.

माझे दोन किंवा अधिक नावांनी खाते आहे. ते एकाच खात्यात समाविष्ट करता येईल काय?

नाही. पण हे प्रारुप लवकरच उपलब्ध होईल. याची नोंद घ्या कि बहुतेक वैयक्तिक प्रकल्पांवरील सदस्यनावे ही ऐनवेळी बदलता येऊ शकतात.

कुणीतरी दुसऱ्या विकिवर माझे नाव वापरीत आहे. मला ते खाते कसे मिळेल?

इतर खाते असण्याने आपणास वैश्विक खाते मिळण्यास रोकता येत नाही.तरीपण आपण एखादे सदस्यनाव मिळण्यास उच्चदर्जाचे दावेदार नसू शकता जर,उदाहरणार्थ,तसेच नाव असणाऱ्या एखाद्या दुसऱ्या सदस्याने अधिक संपादने केली असू शकतात किंवा तो प्रचालक किंवा अधिकारी या गटात असू शकतो. आपण त्यांना पुनर्नामाभिधानास विचारावयास हवे, किंवा, आपणास आपल्या खात्यचे नाव बदलावे लागेल.

आपण, वापरात असलेले दुसरे सदस्यनाव बळकावण्याची प्रतिपालकास विनंत्या/सदस्यनाम बदल येथे एक विनंती टाकू शकता.

इतर विकिंवर मला स्वयंशाबित स्थिती मिळेल काय?

नाही. आपणास स्वयंशाबीत स्थिती मिळण्यासाठी, प्रत्येक विशिष्ट विकिवर, योग्य वेळ येईपर्यंत थांबावे लागेल.

खाते-निर्माण-प्रतिबंधन विकिंवरील खाते मी विलीन करु शकतो काय?

नाही. ते सध्या शक्य नाही. हे एखाद्या सदस्यास खुल्या विकिवर खाते उघडण्यास व ते नंतर प्रतिबंधित विकिवर विलीन करण्यास रोखण्यासाठी आहे.त्याने प्रतिबंधित असलेल्यावर, त्या सदस्यास प्रवेश मिळणे सुकर होईल.

हे ही बघा

घोषणा व बातम्या

टांचणे